User talk:Suhas bawane

Page contents not supported in other languages.
From Wikipedia, the free encyclopedia

संगणकाची माहिती (Computer Information)

संगणक म्हणजे काय ? संगणकाला इंग्लिश मध्ये कॉम्प्युटर (Computer) असे म्हणतात. 'Computer' हा शब्द 'compute' ( कोम्प्युट) या इंग्लिश क्रिया पदा पासून बनला आहे. COMPUTER म्हणजे आकडे मोड़ किवा गणना करणे.५० वर्षा पूर्वी जेव्हा कॉम्प्युटर या शब्द प्रचलित झाला तेव्हा संगणक या यंत्राचा वापर मुख्यत आकडे मोड़ करण्यासाठीच केला जात असे, परन्तु दिवसोंन दिवस या यंत्रात अनेक सुधारणा होत गेल्या व अलीकड़े संगणकाचा वापर तर अनेक प्रकारे होवू लागला आहे. उदा . माहिती पाठवणे , तिचे वर्गीकरण करणे इतकेच नाही तर ध्वनी निर्मिती , चित्रीकरण अन्य असख्य कामासाठी संगणकाचा वापर होवू लागला आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर संगणक हे माहिती स्वीकारणारे , दिलेल्या सूचना नुसार माहिती प्रक्रिया करून अचूक उत्तर देणारे वेगवान इलेक्ट्रोनिक्स यंत्र आहे.