Jump to content

User:कुमार भोसले

From Wikipedia, the free encyclopedia

महान वैज्ञानिक स्टीफन हाँकिंग

'आयुष्यात सरळ साधं आणि सोपा मुळीच नसतं पण मिळालेल्या आयुष्याला सुंदर बनविण्याचा प्रयत्न आपण करायला हवा', असंच त्याला म्हटलं आणि जगप्रसिद्ध वैज्ञानिक आइन्स्टाइन यांच्या बरोबर ज्याची तुलना केली जाते. त्या स्टीफन हॉकिंग नावाच्या एका अफाट बुद्धिमत्तेच्या मानवाने आपल्या विज्ञानाच्या संशोधनानं आणि लेखनाच्या विज्ञान विश्व प्रचंड समृद्ध केलं.
स्टीफन हॉकिंग यांचा जन्म 8 जानेवारी 1942 रोजी ऑक्सफर्ड (इंग्लंड) येथे झाला. जेव्हा स्टीफन हॉकिंग यांचा जन्म झाला. त्या अगोदर बरोबर तीनशे वर्षापूर्वी विज्ञानाचा नवी दिशा दाखवणारा गँलिलिओ मरण पावला होता आणि गुरुत्वाकर्षणाचा शोध लावणारा न्यूटन जन्माला आला होता लहानपणी हाँकिंग यांना वाचनाची आवड होती विद्यार्थीदशेपासूनच त्यांना संगीत, गणित आणि भौतिक शास्त्र म्हणजेच विज्ञानाची आवड होती स्टीफन बँकिंग आठ-नऊ वर्षांची असल्यापासून आपण मोठे झाल्यावर शास्त्रज्ञ व्हायचे अशी स्वप्ने बघत असतात घरात असलेल्या घड्याळ आणि रेड्या यासारख्या कितीतरी वस्तू त्यांना आकर्षित करता. आपल्याला विज्ञान चांगलं समजलं तर या सगळ्या वस्तू कशा चालतात हे कळू शकेल असं त्यांना वाटत असे.
वयाच्या सतराव्या वर्षी हॉकीगंन ऑक्सफर्ड विद्यापीठात रसायनशास्त्र भौतिकशास्त्र आणि गणित हे विषय शिकण्यासाठी जायचं ठरवलं ऑक्सफर्ड विद्यापीठात हे इंग्लंडमधील पहिले विद्यापीठ ऑक्सफर्डला असताना हॉकिंग यांनी काँस्माँलाँजी हा विषय निवडला आणि विश्व कसं निर्माण झालं, यासारखे अनेक प्रश्न त्यांच्या मनात पिंगा घालू लागले या विषयाने त्यांना अक्षरश: झपाटून टाकल. या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपण डॉक्टरेट (पीएचडी) करायला हवी, असं हाँकिंग त्यांना तीव्रतेने वाटायला लागले आणि 1962 मध्ये त्यांनी केंब्रिज विद्यापीठात प्रवेश घेतला

केंब्रिज विद्यापीठात स्टीफन हॉकिंग खूप रमले आणि त्यांनी संशोधनाला सुरुवात केली तेथील मित्रांसोबत ते आपल्या मनातल्या कल्पना विचार आणि मते यांची देवाण-घेवाण करीत. त्यात त्यांना मिळालेले मार्गदर्शन डेनिस शियामा यांनी देखील खूप प्रोत्साहन दिले आणि वेगवेगळे सहाय्य केलं 1962 सालाच्या ख्रिसमस सुट्टीसाठी हँकिंग घरी गेले जाण्यापूर्वी त्यांना पायात बूट घालताना त्रास व्हायला लागला हा त्रास एवढा वाढायला लागला की साधी लेस ही बांधता येईना त्यावेळी हॉकिंग यांच्या सर्व तपासण्या केल्या तेव्हा जो निष्कर्ष हाती आला त्यामुळे त्यांचे आई-वडील हादरलेच कारण त्यांच्या लाडक्या मुलाला हाँकिंगला मोटारन्युराँन नावाचा विकार झाल्याचे निष्पन्न झालं होतं इंग्लडमध्ये याला मोटार न्यूरॉन डिसीज (एमएनडी)तर अमेरिकेत 'अमायो ट्रापिक लँटरल स्क्लेरोसिस'(एएलएस)असं म्हणतात. या विकारात शरीरातल्या स्नायूंवर नियंत्रण राहत नाही स्नायूची नैसर्गिक हालचाल करणारा मेंदूचा भाग काम करेनासा होतो. हळूहळू चालणं बोलणं सगळच थांबतं श्वास घेणारे स्नायूही काम करेनासे होतात आणि ऑक्सिजन न मिळाल्याने रुग्ण तडफडून मरतो. मोटार न्यूरॉन या रोगावर आज तरी औषध नाही. जेव्हा हॉकिंग यांना कळले की हा आजार आपल्याला झाला आहे तेव्हा त्याच्या मनात प्रश्नांचं काहूर उमटलं मरण्याची भीती दाखवणारा हा रोग (आजार) मला का झाला? मी पुढे काहीही करू शकणार नाही. या विचारानी हॉकिंग यांच्या डोळ्यासमोर अंधार झाला मी कसे आयुष्य जगू यावर ते विचार करू लागले. आजार जास्त बनवल्यानंतर हॉकिंगला हॉस्पिटलमध्ये नेले त्यावेळी त्यांच्या शेजारच्या खाटेवर ल्युकेमनिआ झालेला एक लहान मुलगा त्यांना बघायला आला त्याचं बोलणं हसणं आणि मिळून मिसळून वागणे यामुळे हॉकिंगना त्याचा लळा लागला आणि त्या दिवशी तो गोड निव्यार्ज चेहऱ्याचा मुलगा हॉकिंग यांच्या डोळ्यादेखत मृत्युमुखी पडला तेव्हा हॉकींग यांनी विचार केला कि आपल्यापेक्षा वाईट परिस्थितीत कितीतरी लोक आहेत मग आपण एवढे का हादरलो आहेत? आपल्याला वाईट काय वाटतंय ?नैराश्‍य काआलं? या प्रश्नांची उत्तरे त्यांना सापडली त्यांच्या मनावर साम्राज्य करत असलेले नैराश्याचे ढग पांगले होते आणि आशेचे निरभ्र आकाश त्यांच्या मनाला जगण्याच्या तीव्र इच्छेकडे खेचून नेत होतं आता मात्र आयुष्यात काहीतरी अतिभव्य करूनच दाखवायचं असा हॉकिंग यांनी निश्चय केला. पण डॉक्टरांनी त्यांना 'तू फक्त दोनच वर्ष जगशील', शील असे सांगितले.ही परिस्थिती त्यांनी पीएचडी मार्गदर्शकांना सांगितली लवकरात लवकर पीएचडी पूर्ण व्हावी म्हणून त्यांनी प्रयत्न सुरू केले पण त्यांच्या मार्गदर्शकांनी कुठले आहे परिस्थितीत आपण कामाच्या बाबतीत तडजोड करणार नाही मग हॉकिंग मारणार असेल तरीही ही अशा शब्दात नकार दिला. हातातल्या काठीच्या आधाराने कशी तरी पावले टाकायला त्यांनी सुरुवात केली आणि पीएचडीचे संशोधन सुरू झाले. पीएचडीचा अभ्यास सुरू असताना एकदा लंडनमध्ये गणितज्ञ रॉजर पेनरोज यांचे भाषण ऐकायला स्टीफन हॉकिंग गेले. तार्‍यातील इंधन संपल्यावर तो बिंदू वत होऊ शकतो, असे निष्कर्ष पेनरोज यानी भाषणात मांडले यावरून स्टीफन हॉकिंग यांनी स्वतंत्र अभ्यास करून संपूर्ण विश्वाचा ही ताऱ्याप्रमाणे अंत होऊ शकतो असा निष्कर्ष काढला. या प्रबंधावर हॉकिंग यांना डॉक्टरेट मिळाली पीएचडी पूर्ण होत असताना हॉकिंग यांनी फेलोशिपसाठी अर्ज केला. त्यात त्यांची सल्लागार समितीने निवड केली. ही फेलोशिप केंब्रिज विद्यापीठात मानाची मानली जायची. 14 जुलै 1965 या दिवशी हॉकिंग यांनी जेन या महिलेशी नोंदणी पद्धतीने लग्न केले जेलच्या सहवासानं त्यांना जगण्याचे बळ मिळाल आणि नव्या जोमाने अभ्यास सुरू केला आपलं शरीर हळूहळू कमकुवत होईल पण मेंदू तसाच राहील.आपण विचार नक्कीच करू शकू, या विचाराने त्यांना मोठा दिलासा मिळाला. 1965 सालच्या डिसेंबरमध्ये अमेरिकेतल्या मायामी येते सापेक्षतावादाविषय परिषद भरली होती. त्यात हॉकिंग यांच्या मित्राने त्यांचे भाषण वाचून दाखवले.त्या नंतर हॉकिंग यांनी 'सिंग्युलँरिटीज अँड दि जिओमेट्री आँफ स्पेसटाइम' हा संशोधन प्रबंध लिहिला त्याबद्दल त्यांना 1966 साली 'अँडास प्राईज' मिळाले. त्यानंतर त्यांच्या आजारानं पुन्हा वाढायला सुरुवात केली आणि चक्क कोंबड्या वापरण्याची वेळ त्यांच्यावर आली काही दिवसांनी हॉकिंगना हालचाल करणंही अशक्य झाल. मग व्हीलचेअर चा आसरा घ्यावा लागला या दरम्यान त्यांना रॉबर्ट,ल्युसी आणि हीमोची नावाची मुले झाली. स्टीफन हॉकिंग यांनी नंतर कृष्णविवर या विषयाकडे लक्ष वळले यावर आईन्स्टाईनच्या सापेक्षतावादाच्या सिद्धांताची जोड देऊन ग्रहीते मांडणे सुरू केले त्यावेळी हालचाल होत नसल्यामुळे अवघड गणिती त्यांनी केवळ मनातल्या मनात सोडवली.1974 सालि हॉकिंग यांनी पहिल्यांदा पुंजयामिक आणि सापेक्षतावादाचा सिद्धांत यांनी सांगड घालून दोन सिद्धांतांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. स्टीफन हॉकिंग यांचे मत पटवल्यावर त्या नव्या निष्कर्षाप्रमाणे होणार्‍या किरणोत्सर्जनाला'हाँकिंग उत्सर्जन' असे नाव देण्यात आले. त्याच वर्षी स्टीफन हॉकिंग यांचा 'कृष्णविवर' या विषयावरील प्रबंध इंग्लंडच्या 'नेचर' या नियतकालिकेत प्रसिद्ध झाला आणि त्यांंची रॉयल सोसायटीचा फेलो म्हणून निवड झाली. ही बहुमानाची गोष्ट होती आणि हा मान वयाच्या बत्तिसाव्या वर्षी मिळणार म्हणजे अचाटच होतं. 1979 सालि 'राँयल असोसिएशन फाँर डिसएबिलिटीअँड रिहँबिलिटेशन' या संस्थेने मॅन ऑफ दि इयर'हा किताब हाँकिंग यांना प्रदान केला यामध्ये हाँकिंग यांनी अपंगाच्या बाजूने आपली मते मांडली होती. अपंगांना वेळ न टाळता नॉर्मल मुलाप्रमाणे वाढवलं पाहिजे, असाही त्यांचा आग्रह होता. अमेरिकेतला प्रतिष्ठेचा अल्बर्ट आईन्स्टाईन पुरस्कार भौतिकशास्त्राच्या संशोधनासाठी दिला जातो 1978 झाली हा पुरस्कार मोठ्या सन्मानाने हाँकिंग यांना देण्यात आला.1979साली आईन्स्टाईन जन्मशताब्दी वर्षानिमित्त केंब्रिज विद्यापीठात हाँकिंग त्यांचे अनेक लेख एकत्र करून एक पुस्तक प्रसिद्ध केलं. तसेच जनरल रिलेटिव्हीटीः अन आइस्टाइन सेंटिनरी सव्हे याचं हाँकिंग यांनी सहसंपादन करू पुस्तकातही प्रसिद्ध केलं. या पुरस्काराला भरपूर प्रतिसाद मिळाला

1980 च्या दशकात हाँकिंग यांना ऑक्सफर्ड प्रिस्टन न्युयाँर्क लँकेस्टर,नोत्र दाम इंग्लंड अमेरिका फ्रान्स या देशातल्या विद्यापीठानी 'डॉक्टरेट' ही पदवी दिली. इंग्लंडच्या एलिझाबेथ या दुसऱ्या राणीनं त्यांना कमांडर ऑफ दि ब्रिटिश एम्पायर (सीबीई) ही पदवी बहाल केली.

'ए ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम' या पुस्तकात हॉकिंग यांनी कुठली ही संकल्पना अत्यंत सोप्या तऱ्हेने मांडली आहे आणि ती उलगडत उलगडत त्यानी दुसर्‍या संकल्पना पण मांडल्या आहेत. हे पुस्तक एवढे प्रसिद्ध झाले की संडे टाईम्स'च्या बेस्ट सेलिंग बुक्सच्या यादीत हे पुस्तक 184 आठवडे म्हणजे चक्क जवळपास साडेतीन वर्षे होतं. या पुस्तकाच्या रूपाने विक्रीतून चांगला वाटला आणि कळस म्हणजे हे पुस्तक गिनिस बुक ऑफ द वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये जाऊन बसलं या पुस्तकाच्या खपाने विक्रमी उच्चांक गाठला आणि कळस म्हणजे हे पुस्तक 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' मध्ये जाऊन बसलं हाँकिंग यांचे नाव या पुस्तकाने जगभर पोहोचले त्यांची लोकप्रियता इतकी वाढली की'परमेश्वराचं मन जाणणार भौतिकशास्त्र'या शब्दांंत त्यांना संशोधले गेले. 1990 साली त्यांची पत्नी जेल त्यांनी घटस्फोट घेतला आणि 1995 साली त्यांनी इलेनी मेसर या त्यांच्या नर्सशी लग्न केले.इलेनीन ही त्यांची हाँकिंग याची सेवा करत असे. 2001 साली स्टीफन हॉकिंग यांनी भारताला भेट दिली त्यावेळी त्यांनी 'प्रेडिक्टिंग द फ्युचरःफ्राँम अँस्ट्राँलॉजी टू ब्लॉक होल्स'या विषयावर दिल्लीतल्या सिटी पोर्ट सभागृहात व्याख्यान दिले तसेच मुंबईत होमी भाभा सभागृहात त्यांनी'दि युनिव्हर्स इन अ नटशेल' या विषयावर उपस्थितांशी संवाद साधला. प्रत्येक पदार्थाचा मूळ भाग हा कणांच्या स्वरूपात नसतो तर तो दोराच्या स्वरूपात असतो'असा स्ट्रिंग सिद्धांत हॉकिंग यांनी यावेळी मांडला होता. हॉकिंग यांना जन्मभरासाठी व्हीलचेअरला जखडून घेत राहावे लागते बोलताही येत नसल्याने त्यांच्यासाठी खास बनवलेल्या कॉम्प्युटर बरोबर त्यांना दर सेकंदाला एक अक्षर याहीपेक्षा कमी वेगाने संभाषण करावे लागत असे.हाँकिंग यांचीव्याख्याने जगभर आयोजित केली जात असत. त्यांच्या व्याख्यानाच्या सीडी व्हीलचेअरच्या खाली बसवलेल्या कम्प्युटरमध्ये टाकली जात असे.मग हाँकिंग व्याख्यानास चालू करत असे ते व्याख्यानात खूप रमून जात असत. 2013 स*** हॉकिंग यांनी आपले आत्मचरित्र 'माय ब्रीफ हिस्ट्री' या नावाने प्रसिद्ध केले आणि जगभरातल्या लोकांनी त्यांना पसंती दिली 2014 सली जेम्स मार्श यानी दिग्दर्शित केलेले 'द थिअरी आँफ एव्हरीथिंग्ज हा चित्रपट प्रसिद्ध झाला. त्यात हॉकिंग यांचे आयुष्य आणि कार्य उलगडून दाखवले आहे या फिल्मबद्दल हाँकिंग यांना विचारले असता ते म्हणतात,'हि फिल्म विज्ञानावर आहे विज्ञान त्याचे केंद्र आहे आणि शारीरिक व्याधीने जे लोक त्रासले आहेत'त्यांना जगण्याची उमेद या फिल्ममधून मिळते.' आधुनिक विज्ञानाचा जनक गॅलिलिओ यांच्या मृत्यूनंतर बरोबर तीनशे वर्षांनी हॉंकिंन्सचा जन्म झाल्याचा स्टीफन हॉकिंग यांना अभिमान वाटतो. गॅलिलिओने आधुनिक विज्ञानाचा पाया रचला. न्यूटन ने विज्ञानाला पुढची वाट दाखवली.तर आईन्स्टाईनच्या सापेक्षतावादने विज्ञानाच्या जगात खळबळ उडाली.त्यानंतरचं पाऊल हॉकिंग यांनी उचलला. अगदी लहानशा गोष्टीनी आपण एकदम खचतो तेव्हा हाँकिंग कडे बघितल्यावर स्वतःची लाज वाटते. 1963 साली'फक्त दोन वर्षे जगशील'असं तज्ञ डॉक्टरांनी भाकीत करूनही मृत्यूलाहि तब्बल पन्नास वर्षांहून अधिक काळ ओशाळवणारा हाँकिंग ग्रेटच मानायला पाहिजे. या महान वैज्ञानिकाला 14 मार्च 2018 रोजी मृत्यूने गाठले'मला खूप संशोधन करायचे आहे. अनेक सिद्धांत शोधून काढायचेत.संशोधन पुढे न्यायचे आहे,'असे हाँकिंग म्हणायचे.पूर्ण विश्‍वाचे कोडे उलगडण्याचा हाँकिंग यांनी प्रयत्न केला. त्यांच्या चिकाटीला,जिद्दीला आणि बुध्दीला सलाम!