User:Phapaleishwar
आज आपण महाराष्ट्रामध्ये २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा दिवस म्हणून साजरा करतो . २७ फेब्रुवारी या दिवशी मराठी साहित्यातील महान व्यक्तिमत्व वि वि शिरवाडकर म्हणजेच ज्ञानपीठ विद्यापीठ पारितोषिक विजेते आपण त्यांना प्रेमाने कुसुमाग्रज म्हणतो त्यांचा जन्मदिवस. याशिवाय जागतिक संस्था युनेस्को यांनी दखल घेऊन १९९९ पासून आपण २१ फेब्रुवारी हा दिवस जागतिक मातृभाषा दिन साजरा करण्याचे आव्हान केले तरी आपल्या महाराष्ट्र मधील जनतेने २१ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी हा मायबोली भाषा सप्ताह म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली.आपण सर्वच स्वभाषा प्रेमी सतत आपल्या मायबोली आईच्या समृद्धीची स्वप्ने पाहत असतो आणि ही आपल्या अभिमानाची गोष्ट आहे आणि पुढेही अशाच प्रकारे मराठी भाषा दिन साजरा होईल आणि तो आपण नेहमीच साजरा करूया. धन्यवादकदाचित माहीत नसेल, पण मराठी एक वैज्ञानिक भाषा आहे. तिचं कोणतंही अक्षर असं का आहे, त्यामागे ही काही कारण आहे. इंग्लीश मधे ही गोष्ट नाही दिसत. ___________________________ क, ख, ग, घ, ङ - यांना *कंठव्य* म्हणतात.कारण यांचा उच्चार करताना ध्वनि कंठातून निघतो.एकदा करून बघा.
च, छ, ज, झ,ञ- यांना *तालव्य* म्हणतात.कारण यांचा उच्चार करताना जीभ टाळू ला लागते. एकदा करून बघा
ट, ठ, ड, ढ , ण- यांना *मूर्धन्य* म्हणतात.कारण यांचा उच्चार जीभ मूर्धा ला लागल्याने होतो.एकदा म्हणून बघा.
त, थ, द, ध, न- यांना *दंतव्य* म्हणतात.यांचा उच्चार करताना जीभ दातांना लागते. एकदा म्हणून बघा.
प, फ, ब, भ, म,- यांना *ओष्ठ्य* म्हणतात.कारण यांचा उच्चार ओठ जुळल्याने होतो. एकदा म्हणून बघा . _____________________________
आपल्याला आपल्या भाषेचा अभिमान वाटतो पण तो का , ते पण लोकांना सांगा.एवढी वैज्ञानिकता इतर कुठल्या ही भाषेत नसेल.
जय मराठी ! क,ख,ग काय म्हणतात बघू जरा .... ••••••••••••••••••••••••••••••••••• क - क्लेश करू नका ख- खरं बोला ग- गर्व नको घ- घमेण्ड करू नका च- चिँता करत राहू नका छ- छल-कपट नको ज- जवाबदारी निभावून न्या झ- झुरत राहू नका ट- टिप्पणी करत राहू नका ठ- ठकवू नका ड- डरपोक राहू नका ढ- ढोंग करू नका त- तंदुरुस्त रहा थ- थकू नका द- दिलदार बना ध- धोका देऊ नका न- नम्र बना प- पाप करू नका फ- फालतू कामे करू नका ब- बडबड कमी करा भ- भावनाशील बना म- मधुर बना य- यशस्वी बना र- रडू नका ल- लालची बनू नका व- वैर करू नका श- शत्रुत्व करू नका ष- षटकोणा सारखे स्थिर रहा स- सत्य बोला ह- हसतमुख रहा क्ष- क्षमा करा त्र- त्रास देऊ नका ज्ञ- ज्ञानी बना !!
कृपया सर्व मराठी लोकांना पाठवा.
- मराठी बोला अभिमानाने*