Jump to content

User:Suhas9717

From Wikipedia, the free encyclopedia

अधूर प्रेम ! कारण काय ? लोक काय म्हणतील? प्रियांकाच रवि वर जीवापाड प्रेम होत, रवि च ही तितकच प्रेम होत तिच्या वर. . . . पण कोणाची नजर लागली अन् दोघांत वादावादी सुरू झाली. लहानसहान कारणांवरून नात्यांत दुरावा येत होता. कधी त्याला नको आता, बस्स! कधी तीला नकोच अस प्रेम अस वाटायला लागलं.... महिन्यानंतर दोघांची नजरानजर झाली अन् पुन्हा प्रेमाला जाग आली जणू.... असच मग आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे...... नव्या पर्वाला उधाण आल होतं... दोघेही खूप खुश असताना, प्रियांकाने रवि ला घरी ये, आईबाबांना भेट असा हट्ट धरला. तो लग्नाला सध्यातरी तयार नसावा, पण प्रियंका मनोमन त्याला पती मानत होती. तीची सततचा आपण लग्न कधी करायच? तू घरी केव्हा येणार?? आईबाबांना घेऊन ये ना मागणी करायला! या वरून पुन्हा खटके उडायला सुरूवात व्हायची. पुन्हा त्या आणाभाका, जगण्या_मरणाच्या वचन घेत ती त्याला धीर द्यायची. तू फक्त एकदा बोलून बघ ना आईबाबांना! त्यानी नकार दिला तर मी स्वतःहून तुझ्यासोबत येईल. . पण एकदा भेट ना त्यांना असी साधी अट तिची.... त्याचा हट्ट एकच नेहमीचा की, आपण पळून जाऊन लग्न करू.... सगळ्यांपासून दूर जाऊ, आपल नव विश्व निर्माण करू...... तिला हे सर्व मान्य होत पण तीला आईबाबांच्या परवानगीने त्याच्यासोबत संसार थाटायचा होता. शेवटी तो नाहीच आला आणि तीने ही त्याला नकार दिला.... पाच-सहा वर्षे पूर्ण झालीय..... आता त्याच लग्न झालय पण दुसर्‍या मुलीसोबत, आणि त्याला दोन वर्षाची गोंडस मूलगी ही आहे. प्रियांकाच्या घरी ही कांदेपोह्याच्या कार्यक्रमाची तयारी सुरू आहे.... त्याने धाडस केल असत तर कदाचित त्याचं प्रेम फुलल असतं...समाज म्हणजे दुसरा तिसरा कोणी नाही. . . समाज म्हणजे आपणच असतो. आपण, आपले पालक, नातेवाईक, मित्रमंडळी, शेजारीपाजारी या सगळ्याचा मिळून समाज तयार होतो. प्रेम ही भावना असते आणि त्यात वाईट अस काही नाही. प्रेम सर्वांना होतच आयुष्यात. पण सर्वांना पहिलं प्रेम मिळतच अस ही नाही. खूप कारण ही असतात. जस एका जाती चे नसल्याने लग्न होत नाही. घरची परिस्थिती, लोक काय म्हणतील?, समाजात इज्जत राहणार नाही, आणि आईबाबांना दुखावून जगता नाही येणार...हिम्मत होत नाही घरी सांगण्याची मग हमारी अधूरी कहानी म्हणत मुळीमुळी रडायच... घरचे म्हणतील त्या अनोळखी व्यक्तीला सोपवून द्यायचस्वतःला.अडाणीपणाच ह्याहून वेगळ उदाहरण कोणत असणार? आहो..तुमच्या मुलींना तुम्ही च शिकवताना की, अनोळखी माणसांना बोलायच नाही, कुणी काही दिलं तर घ्यायच नाही. आपली माहीती सांगायची नाही आणि तुम्हीच मुलगी मोठी झाली की एक प्लेट पोहे अन् कप भर चहासोबत मूलगी पाहण्याचा कार्यक्रम करता! संपूर्ण आयुष्य ज्याच्या सोबत जगायचय त्याची ओळख फक्त तासाभरात होते????लग्ना अगोदर प्रेम असण्यात काय चुकीचे आहे? चित्रपट पाहताना अभिनेत्याला अभिनेत्री भेटली नाही तर हळहळत रडणारे तुम्ही, स्वतःच्या मुलामुलींना एका अशा परक्या ठिकाणी किती सहजपणे लग्न लावून मोकळे होता?मला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे हवी आहे म्हणून अस बोलतेय मी.पटतय का तुम्हाला?जरा विचार करा, आपण ही त्या वयात कोणावर प्रेम असताना दुसर्‍या कुणाला तरी अनोळखी व्यक्तीला सोपवल, अगदी सहज. . .का?? बदनामी नको व्हायला म्हणून? अरे...! कसली बदनामी?? नाही ? मग का? आईबाबांच्या आनंदासाठी?? खरचं?? तुम्ही तुमच्या आईबाबांना आनंदी ठेवण्यासाठी ते म्हणतील त्या व्यक्तीसोबत लग्न करू शकता मग ते तुमच्या आनंदात आनंदी नाहीत का राहू शकत???आईबाबांना काय अपेक्षित असतं? आपल्या मुलामुलींना यशस्वी, सुखी, समाधानी पाहायच असतं मग आयुष्याचा ईतका महत्त्वाचा निर्णय आपण मुलामुलींना का घेऊ देत नाही????