User:Sureshsdaoo
"सूर्यसिध्दान्त"
।सूर्यसिध्दान्ता मधीलअयनांश विचार।
'अयनांश साधनम् '
त्रिंशतकृत्यो युगे भानां चक्रं प्राक् परिलम्बते।
तद् गुणाभ्दूदिनैर्भक्ताद् द्युगणाद्यदवाप्यते ।।9॥
तद्दोस्त्रिघ्ना दशाप्तांशा विज्ञेया अयनाभिधा: ।
तत्संस्कृताद्ग्रहात् क्रान्तिच्छाचरदलादिकम् ॥10॥
(सूर्यसिध्दान्त त्रिप्रश्नाधिकार )
एका महायुगामध्ये नक्षत्रचक्र 30 x 20 =600 वेळा पूर्वदिशेत परिलम्बित होते.अयनांश साधन करण्याकरिता 600 ने अर्हगणांस गुणावे आलेल्या गुणाकारांस युग सावन दिन संख्येने भाग द्यावा. आलेल्या लब्धिस भुज समजुन 3 ने गुणावे व 10 ने भागावे म्हणजे अयनांश येतात.या अयनांश संस्कृत ग्रहा (सायनग्रह) द्वारे क्रान्ति,छाया,चरखंड इत्यादिचे साधन करीता येते.
अयनांश हा अयनबिंदुच्या अभिष्ट स्थितिचा दर्शक असतो.सूर्याचा क्रांतिवृतस्थ मार्ग विषुव वृत्ताला जेथे छेदुन उत्तरेकडे जातो,त्या छेदनबिंदुत सूर्य आला म्हणजे सायान वर्षाचा प्रारंभ होतो.याच छेदनबिंदुला 'वसंतसंपात' किंवा 'मेष संपात' (अश्विन्यादि) असे म्हणतात.सायान पध्दतिप्रमाणे याच छेदनबिंदुमध्ये क्रांतिवृतावर मेषारंभ मानून तेथुन राशिविभागांची गणना केल्या जाते.पण प्रत्यक्षांत असे होते की,अाकाशिय क्रांतिवृतातील ज्या एका विवक्षित स्थानी एकदा सूर्याचा मार्ग विषुव वृत्ताला छेदून गेला, त्याच स्थानि त्याचा पुन्हां पुढील वर्षारंभी छेद होत नाही,तर तो त्याच्या किंचीत मागे होतो.म्हणजेच असे की, आकाशांतील नक्षत्रमंडलामध्ये सूर्याची पुर्ण प्रदक्षिणा होण्याच्या अगोदरच तो विषुवृत्ताला छेदून उत्तरेकडे जाऊं लागतो.हे जसे मेष संपाताच्या ठिकाणीं घडते, तसेच ते तुलासंपाताच्या ठिकाणी छेदून दक्षिणेकडे जातानांही घडते.विवक्षित अचलस्थान व त्यापासुन मागे मागे चलित होणारे अयनस्थान यांच्यामध्ये जे अंतर असते,त्यालाच 'अयनांश' असे म्हणतात 'अयनचलनस्य दृक्प्रतीति:'
स्फुटं दृक् तुल्यतां गच्छेदयने विषुवद्वये ।
प्राक् चक्रं चलितं हिने छायार्कात करणागते ॥11 ॥
अन्तरांशैरथावृत्य पश्चाच्छेषैस्तथाधिके ।
(सूर्यसिध्दान्त: त्रिप्रश्नाधिकार)
क्रांतिवृत्तातील कोणत्यातरी एका विवक्षित अचलस्थानापासून सूर्याची उदगयन-दक्षिणयनस्थाने अशाप्रकारे नक्षत्रमंडलामध्ये मागे मागे सरकत येणे,यालाच 'अयनचलन'
असे म्हणतांत,यालाच कोणी 'संपातचलन' असेही म्हणतांत.सूर्यसिध्दान्ताच्या प्रस्तुत श्लोकानुसार दोन अयनबिन्दु (सायन कर्क व सायन मकर ) अणि दोन विषुव बिन्दु (सायन मेष व सायन तुला ) वर सूर्यसंक्रमणाच्या वेळी अयनचलनाचे स्पष्टपणे आकलन
होऊ शकते छायार्काचे (वेधोपलब्ध सूर्य) भोगांशअल्प असल्यांस संम्पाता पासुन नक्षत्रमंडल पूर्वेकडे चलीत होते अाणि सूर्याचे भोगांश जास्त असल्यांस संम्पाता पासुन नक्षत्रमंडल पश्चिमेकडे चलीत होते.
अशा प्रकारे होणारे अयनचलनआकाशातील अचलबिन्दुपासुन दरवर्षी कीती मागे येतो ते पाहूं.क्रांतिवृत्तावरील एका विवक्षित अचल स्थानापासून सूर्य निघून तो नक्षत्रचक्रांत पूर्ण परिभ्रमण करुन पुन्हा त्याच अचलस्थानी येण्याकरीता जो वेळ लागतो,त्याला 'नाक्षत्रसौर' वर्ष असे म्हणतांत त्याचे मान 365 दिवस,15 घटिका,22पळे,53 विपळे येवढे ठरविले आहे. आणि सूर्य एकदा विषुव वृत्ताच्या उत्तरेकडे गेल्यापासून पुन्हां तसाच उत्तरेकडे जाईपर्यंत जो वेळ लागतो त्याला सायन वर्ष म्हणतात या सायन वर्षाचे मान 365 दिवस,14 घटिका,31 पळे, 54 विपळे एवढे आहे. सूर्य सिध्दान्ता व ग्रहलाघव ग्रंथाप्रमाणे तयार केलेल्या पंचांगा मध्ये त्यांच्या गणितानुसार सूर्याचे वर्षमान 365 दिवस,15 घटिका,31पळे, 31विपळे एवढे आहे.सूर्य सायन वर्ष पुरे करुन नक्षत्रसौर वर्ष कालापेक्षा जास्त पुढे जाईल.अर्थात तयाप्रमाणे अयनचलगति 50.2 विकलांपेक्षा जास्त होईल,या वर्षमाना प्रमाणे ती 58.8 विकला येते.ग्रहलाघव ग्रंथाप्रमाणे ती 60 विकला मानलेली आहे. सूर्याचे वर्षमान निराळे झाले की, तदनुसार अयनचलगति कशी निरनिराळी होते हे यावरुन लक्षांत येईल.त्यामुळे अयनांश संख्या देखील कमीजास्त होईल.आकाशांतील ज्या एका विवक्षित अचल बिन्दूपासुन अयनस्थानाचे मोजावयाचे असते तो अचल बिंदू तारात्मक नक्षत्रचक्राचा प्रारंभ हा त्यामागचा मुळ हेतु आहे. या बाबत दोन मते आहेत. 1) शालिवाहन शके 496 मध्ये सूर्याचा वसंतसंपातीय स्थान आकाशांत ज्या स्थानि होते,ते स्थान अश्विनी नक्षत्राचे प्रारंभस्थान मानावे.आकाशांत झीटापीशियम या तारेजवळ त्या वर्षी उदगयन झाले म्हणुन त्या तारे पासून वसंतसंपास्थाना पर्यंतचे जे अंतर येईल याला अयनांश मानावे.या मताप्रमाणे नक्षत्रचक्राचा प्रारंभ झीटापीशियम तारेपासून करावा लागतो ,म्हणून या मतांस 'झीटापक्ष' म्हणण्याचा प्रघात पडला.2) शके 212 मध्ये सूर्याचे वसंतसंपातीय स्थान आकाशांत ज्या स्थानि होते,ते स्थान ,ते स्थान अश्विनी नक्षत्राचे प्रारंभस्थान मानावे.
चित्रानक्षत्राचा जो योगताराआहे त्याच्या भोगापासून 180 अंश अंतरावर ते स्थान आहे.वसंतसंपास्थाना पर्यंतचे जे अंतर येईल नक्षत्राचे प्रारंभस्थानापासून वसंतसंपात स्थाना पर्यंतचे जे अंतर येईल ते अयनांश समजावे.यांत चित्रा नक्षत्राचा उपयोग अश्विनी नक्षत्राचे प्रारंभस्थान ठरविण्याकरीता करण्यांत आल्यामुळे या पक्षाला 'चित्रापक्ष' असे नांव पडले.ग्रहलाघविय मताप्रमाणे शके 444 साली सूर्याचे वसंतसंपातीय स्थान आकाशांत ज्या स्थानि होते,ते स्थान अश्विनी नक्षत्राचे प्रारंभस्थान मानावे.या आरंभस्थानी किंवा त्यासमोर कोणताही तारा नाही.अश्विनी नक्षत्राचे प्रारंभस्थानी जेव्हां उदगयनसंपात असतो, तेव्हां अयनांश शुन्यअसतात.कारण ती दोन्हीस्थाने एकत्र आलेली असतांत या वर्षाला 'शुन्यअयनांशवर्ष' असे म्हणतांत.सूर्य उदगयनसंपातापासून पासून निघुन ज्या मार्गाने परिभ्रमण करीत पुन्हां उदगयनसंपाता जवळ येतो त्या मार्गाचे उदगयनसंपातापासून 12 समान विभाग पाडून त्याला मेषादि राशिंची अनुक्रमे नांवे देतात.त्याचप्रमाणे त्या मार्गाचे 27 समान विभाग पाडून या विभागांस अश्विनीपासून अनुक्रमे नक्षत्रांचीही नांवे देतात. भारतीय ज्योतिष्यशास्त्राचा इतिहास या ग्रंथाचे लेखक कै.शं.बा.दिक्षित यांनी मन्मत म्हणुन सांगितलेल्या निरयन अश्विनीनक्षत्र विभागाच्याआरंभस्थानी राशिचक्रारंभस्थान मानूनआलेल्या निरयन राशि किंवा निरयन नक्षत्र असे समजावे.'सायन' हे विशेषण ज्यांचे मागे उल्लेखिले आहे तेथेच फक्त ती राशि किंवा नक्षत्र सायन समजावे.
अयनांशाच्या संदर्भात प्राचिन सिध्दांतकारांची दोन मते आहेत 1) चक्रभ्रमण 2) दोलाभ्रमण. आचार्य मुञ्जाल यांनी अयनबिंदूच्या चक्रभ्रमणाचा स्विकार केला आहे. तथापि सूर्यसिध्दान्तानुसार अयनबिंदू 27अंश पर्यंत पूर्वेला जाऊन परत 0अंशा पर्यंत वापस येतो आणि पुन्हां 27अंश पर्यंत पश्चिमेला जाऊन परत 0अंशा पर्यंत वापस येतो. 0 अंश ते 27अंश 27अंश ते 0अंश पर्यन्त त्याचि गति घडाळाच्या लोलका प्रमाणे असते.
•
<- / । \ ->
/ । \
पूर्व / । \ पश्चिम
/ । \
°
27अंश 0 अंश 27अंश
संदर्भ :-1.सूर्यसिध्दान्त.प्रो.रामचंद्र पान्डेय,
संस्कृत हिन्दी टिका चौखंबा प्रकाशन. वाराणसि.
2.ग्रहलाघवम् . डाॅ. ब्रम्हानंद त्रिपाठी,संस्कृत हिन्दी टिका चौखंबा प्रकाशन.वाराणसि.
3.ज्योतिर्गणित वैभव.डाॅ. ज्ञानेश्वर कुलकर्णी, डाॅ.विनीता फाटक,मंगेश प्रकाशन,नागपूर
4. सुलभ ज्योतिष शास्त्र. कृ.वि.सोमण,ढवळे प्रकाशन मुंबई.