User:Udayamittimande
जर तुम्ही हल्दीराम मधून संत्रा बर्फी विकत घेणार असाल तर ही बातमी तुमच्या साठी महत्वाची आहे, नागपूर संत्रा नगरी म्हणून प्रसिद्ध असल्याने इथले व्यापारी संत्राबर्फी तयार करतात आणि ही बर्फी तयार करताना त्यात शरीराला अपायकारक घटक मिसळतात जे मानवी आरोग्याला जीवघेणे ठरू शकतात, छोटमोठे हॉटेलमध्येसंत्रा मिठाई मध्ये केमिकल मिसळत असल्याच्या बातम्या आपण अनेक वेळा ऐकल्या असेल मात्र यावेळी ‘हल्दीराम’ च्या संत्राबर्फी मध्ये विशिष्ट रंग आणि साहित्य वापरून निकृष्ट दर्जाची बर्फी मिळत असल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे,
त्यामूळे तुम्ही तुमच्या क्षणाला गोड करण्याचा प्रयत्न करणार असाल आणि हल्दीराम ची मिठाई वापरणार असाल तर हा तुमच्या आरोग्याला अपाय करणारा क्षण ठरू शकतो,
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी हल्दीरामच्या संत्रा बर्फीमध्ये विशिष्ट रंग व साहित्य वापरल्या जात असून ते आरोग्याला अपायकारक असल्याची तक्रार थेट
शासनाकडे केली होती. त्यावरून अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांनी नागपूरच्या अन्न व औषध प्रशासन विभागाला बर्फीची तपासणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत त्याकरिता
मंगळवारी दुपारी हल्दीरामच्या वर्धमाननगर कारखान्याची पहाणी केली. यावेळी तेथील संत्रा बर्फीचे नमूने जप्त करण्यात आले. हे नमूने नागपूर किंवा इतर शहरातील प्रयोगशाळेत तपासणीसाठी गोपनीय पद्धतीने पाठवण्यात आले असूूून. त्याचा अहवाल दोन आठवड्यात देण्याची संबंधित प्रयोगशाळेला विनंती करण्यात आली आहे. अहवालानंतरच ही बर्फी शुद्ध वा त्यात काही दोष आहे, हे स्पष्ट होवून पुढील कारवाई निश्चित होणार आहे.