Jump to content

User:VIKAS GANPATI BHOSALE

From Wikipedia, the free encyclopedia

मी विकास गणपती भोसले कोकले गावचा नागरीक आहे.कोकले गांव हे कवठेमहांकाळ तालुका आणि सांगली जिल्हा मधे येते.निसर्गाच्या क्रूपेने कोकले गावाला एक महांकाली नदी आहे. कृष्णा नदीच्या खोरे मधून अग्रणी नदीचा उगम होतो आणि अग्रणी नदीच्या 7 पाणलोट क्षेत्र पैकी KR-38 या पाणलोट क्षेत्र मधे महांकाली नदी येते.महांकाली नदी ही कवठेमहांकाळ आणि जत तालुक्यातील 20 गावामधून वाहते.त्यापैकी शेळकेवाडी;लंगरपेठ;केरेवाडी;आगळंगांव ;आरेवाडी;ढालेवाडी;मोघमवाडी;इरळी;बसाप्पाचीवाडी;कोकले;करलहट्टी ही 11 गावे कवठेमहांकाळ या तालुक्यात येतात तसेच डोरली;बाज;बेळकी;अंकले;कुडनूर;डफलापूर;खलाटी;मिरवाड आणि शिंगणापूर ही 9 गावे जत तालुक्यात येतात.महांकाली नदीच्या लाभ क्षेत्र मधे कवठेमहांकाळ तालुक्यामध्ये शेळकेवाडी;लंगरपेठ; ;आरेवाडी;ढालेवाडी;बसाप्पाचीवाडी;कोकले मधे प्रत्येकी एक असे एकूण सहा तलाव आहेत आणि जत तालुक्यात बाज;बेळकी;डफलापूर आणि मिरवाड येथे एकूण चार तलाव आहेत. महांकाली नदीच्या लाभ क्षेत्र मधे कवठेमहांकाळ तालुक्यात एकूण 19 बंधारे असून जत तालुक्यात 28 बंधारे आहेत.हे सर्व दहा तलाव आणि 47 बंधारे हे म्हैसाळ आणि टेंभू योजनेमधे येतात.