Jump to content

User:Vivekpatil3399/sandbox

From Wikipedia, the free encyclopedia

तिनविरा धरण(अलिबाग)

[edit]

नदीचे पाणी अथवा अन्य कुठल्याही पाण्याचा प्रवाह अडवून त्याचा मोठ्या प्रमाणावर साठा करण्यासाठी बांधण्यात येणारी भिंत म्हणजे धरण होय.

धरण हे योग्य स्थळी जलप्रवाहाच्या खोऱ्याच्या एका काठावरून दुसऱ्या काठापर्यंत बांधण्यात आलेली एक विस्तृत भिंतच असते. धरण हे पाणी अडवण्यासाठी अथवा पाण्याचा प्रवाह योग्य त्या वेगात आणण्यासाठी बांधली जातात.


महाराष्ट्रात अनेक ठिकाणी लघु , मध्यम , आणि मोठ्या स्वरूपातील धरणे आहेत. तिनविरा धरण हे रायगड जिल्ह्यातील मध्यम स्वरूपाचे धरण असून ते (तालुका:-अलिबाग-पेेण) (NH-१६६A) या महामार्गावर आहे. हे धरण अलिबाग तालुक्यातील तिनविरा गावशेजारी बांधण्यात आले असून धरण अलिबाग तालुक्यापासून १५ किलोमीटर अंतरावर आहे. तिनविरा धरणाचे बांधकाम १९५७ मध्ये सुरू झाले व ते काम १९६१ मध्ये पूर्णत्वास आले.

दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये महाराष्ट्र सरकारच्या पाणी पुरवठा योजनेअंतर्गत हे बांधकाम सुरू होऊन ते पुर्णत्वास येण्यासाठी ३ वर्षाचा कालावधी लागला. धरणाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर या धरणाचे उद्घाटक माननीय श्री होमी जे एच आणि महाराष्ट्र राज्य सरकारचे सार्वजनिक आरोग्य अल्प बचत व पर्यटन खात्याचे मंत्री (उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष) रावसाहेब रामराव नाथोबा नाईक यांच्या हस्ते २७ एप्रिल १९६१ रोजी करण्यात आले.


तसेच या उद्घाटनाच्या कार्यक्रमात कुलाबा (रायगड) जिल्हा लोकल बोर्डचे अध्यक्ष युसुफ अब्दुल्ला हाफिज हे देखील उपस्थित होते. तिनविरा धरण ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचा खर्च १८लाख ९६ हजार २२२ रुपये इतका होता. धरणाच्या बांधकामास सन२०२० पर्यंत तब्बल ६० वर्षे पुर्ण होणार आहेत. मातीच्या भरावाच्या सदर धरणाची उंची सुमारे ४०मीटर (१३१ फूट) असून, धरणाची लांबी ११७५ मीटर इतकी आहे. सदर धरणाची भिंत ही दगडी असून त्या भिंतीला एकूण ४ दरवाजे आहेत.


  • अधिकृत नाव  :- तिनविरा धरण
  • धरणाचा मुख्य उद्देश :- पिण्याच्या पाण्यासाठी वापर
  • स्थान  :- तिनविरा, अलिबाग तालुका,रायगड जिल्हा, महाराष्ट्र
  • धरणाची उंची :- ४० मीटर (१३१ फूट)
  • धरणाची लांबी :- ११७५ मीटर
  • बांधकाम सुरू  :- १९५६
  • उद्घाटन दिनांक  :- २७ एप्रिल १९६१
  • धरण बांधणीचा प्रकार :- मातीचा भराव व दगडी बांधकाम
  • धरणाचे दरवाजे संख्या :-


प्रामुख्याने सागर गडाच्या डोंगरावरून वाहत येणारे पाणी या धरणामध्ये साठवून ते पाणी अलिबाग तालुक्यातील विविध गावांना पुरवले जाते. तिनविरा धरणातर्गत पाण्याचे लाभ घेणाऱ्या गावांची संख्या २२इतकी आहे. पाण्याचा जास्त फायदा धरणाजवळील गावे तिनविरा,पळी यांना होतो. सदर धरण अलिबाग तालुक्यातील गावांना भेडसवणारी पाण्याची समस्या पाहता बांधण्यात आले होते.


तिनविरा धरणालगत असलेली, अलिबाग -पेण महामार्गाच्या डाव्या आणि उजव्या बाजूस (क्षेत्र - ०.९६६० हेक्टर) मध्ये विस्तारलेली महाराष्ट्र शासन वनविभाग अंतर्गत तिनविरा मध्यवर्ती रोपवटीकेमधील (रोपवाटिका क्षमता अंदाजे १०लक्ष) रोपांची लागवड पाण्यावर केली जाते. तसेच धरणाच्या पाण्याचा जास्त फायदा मिळालेली गावे या पाण्यावर फळझाडे ,फुलझाडे,आणि भाजीपाल्याची लागवड करून मोठया प्रमाणावर उत्पादन घेतात.

पावसाळ्यात धरणातील पाण्याची पातळी खूप वाढते हे पाणी धरणाच्या उंच भिंतीवरून वाहून कालव्याच्या माध्यमातून धरमतर खाडीला जाऊन मिळते.



धरणाची सद्यस्थिती

[edit]

या धरणालगत पाच मिनिटाच्या अंतरावर कोटबा या नावाने प्रसिद्ध असलेला धबधबा आणि धरणाच्या उंच भिंतीवरून वेगाने खाली पडणारे पाणी याचा आनंद घेण्यासाठी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात वेगवेगळ्या शहरातून येणारे पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करताना पहावयास मिळतात. धरणाची सध्यास्थिती पाहता या धरणावर मोठ्या क्षमतेने पाणी साठवून ठेवता येईल अशी टाकी आणि पाणी शुद्धीकरण यंत्र उभारण्यात आले आहे. तसेच सदर धरणाचे क्षेत्र संरक्षित केलेले आहे व या धरणाचा उपयोग पिण्याच्या पाण्यासाठी केला जात आहे.

Created By : विवेक पाटील