Base, Maharashtra

From Wikipedia, the free encyclopedia
Jump to: navigation, search

बासे हे भिवंडी तालुक्यातील पाच्छापूर विभागातील डोंगराच्या कुशीत वसलेले ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील छोटेसे गाव. पूर्वेकडे गोंदाडे, पश्चिमेकडे करमाळे, दक्षिणेकडे शिरोळे तर बाकी दिशांनी वेढलेला डोंगर अशाप्रकारे निसर्गाचा जणू आशीर्वाद असलेले हे ११९ घरांचे हे छोटे गाव. ह्या छोट्याशा गावाची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार ५३५ असून त्यात २७८ पुरुष व २५८ महिलांचा समावेश आहे. गावामध्ये कुणबी आणि आदिवासी लोकांचा समावेश आहे. ज्यात २०११ नुसार ६१ आदिवासी लोक होते. साक्षरतेचा दर ७५% असून नवीन पिढीचा साक्षर दर १००% आहे. बासे गाव हे ग्रुप ग्रामपंचायत शिरोळे मध्ये असून त्यात शिरोळे आणि महाप ह्या गावांचा समावेश आहे. गावात जि. प. शाळा असून तेथे १ ली ते ४ थी वर्गाचा अभ्यास क्रम उपलब्ध आहे. गावासाठी शुक्रवारी पाच्छापूर येथे तर मंगळवारी दाभाड ह्या जवळील बाजारपेठ असून दाभाड येथील बाजारपेठेत जास्त ग्रामस्थ जातात. गावातून बाहेर गावात जाण्यासाठी कोणत्याही प्रकारचे साधन नसल्याने बहुतेक लोकांना चालत दाभाड येथे जावे लागते व तेथून रिक्षा, बस अथवा मिनीडोर ने पुढील प्रवास करावा लागतो. बहुतेक लोकांच्या स्वतःच्या दुचाकी असल्याने ११९ घरांमध्ये १५०च्या वर दुचाकी आहेत. गावातील लोकांचा प्रमुख व्यवसाय हा शेती असून काही नोकरदार वर्ग नोकरी निमित्त वासिंद,खडवली येथे स्थलांतरित झाला आहे. गावातील बरेचसे लोक नोकरीनिमित्त वडपे, भोईरपाडा येथील गोडाऊन मध्ये जातात तर काही कुडूस येथील खाजगी कंपनी मध्ये काम करतात. गावात एकही केंद्र सरकारी कर्मचारी नाही परंतु मुंबई महानगरपालिकेत १० ते १२ कर्मचारी असून ३-४ राज्य सरकारी कर्मचारी आहेत. गावाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे आजमितीला गावात एकही आंधळा, पांगळा, लंगडा, बहिरा, मुका, मानसिक रोगी व्यक्ती नाही. गावात प्रवेशासाठी दोन मुख्य रस्ते असून एक शिरोळयातून बास्यात येतो तर दुसरा गोंदाड्यातून. बासे गावात १०० KV चा ट्रान्सफॉर्मर असून महाराष्ट्र राज्य वितरण मंडळ वीजसेवा पुरवते. गावामध्ये वारकरी संप्रदायासोबतच बैठक आणि स्वाध्याय परिवार हे अध्यात्मिक पंथ आहेत. गावामध्ये हनुमान जयंती, माघी गणेशोत्सव आणि विठ्ठल रखुमाई मंदिर वर्धापन दिनानिमित्त तीन पालखी सोहळ्यासह अखंड हरिनाम सप्ताह सोहळे असतात व त्याव्यतिरिक्त सार्वजनिक दुर्गा माता मंडळाचा ९ दिवसांचा दुर्गामाता उत्सव असतो तसेच २०१७ पासून १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती साजरी करण्यात येते. बऱ्याच वर्षांपूर्वी हनुमान जयंती निमित्त कुस्ती साठी प्रसिद्ध असलेले बासे हे गाव काही कारणास्तव कुस्त्या बंद करण्यात आल्याने पुन्हा एकदा अंधारात आलय. क्रिकेट हा बासे गावातील मुख्य खेळ असून गावात ३ ते ४ क्रिकेट संघ आहेत. व्हॉलीबाल हा दुय्यम खेळ असून तो फक्त पावसाळ्यात खेळला जातो. इतर खेळांबाबत अजूनही एवढी जागरूकता नसल्याने फक्त क्रिकेटलाच प्राधान्य दिले जाते. गावामध्ये पिण्याच्या पाण्याची एक विहीर असून तिच्याद्वारे नळांमार्फत घरोघरी पाणी पोहोचवले जाते त्या योजनेसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत २३ लक्ष रुपयांचा निधी मिळाला. गावाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे गावातील लोकांमध्ये बाहेर गावातील लोकांबाबत असलेली आपुलकी त्यामुळेच बासे गावात बऱ्याचशा बाहेरील गावातून मुले शिकण्यासाठी राहायला येतात. पाचवी च्या वर शिक्षण अभ्यासासाठी पाच्छापूर किंवा खांबाळा हे पर्याय उपलब्ध आहेत. व उच्च माध्यमिक शिक्षणासाठी उचाट कॉलेज, खरीवली विद्यालय असे पर्याय उपलब्ध आहेत. भिवंडी शहर हे गावापासून २५ किमी अंतरावर आहे तर अंबाडी हे १३ किमी अंतरावर आहे. विधानसभा उमेदवार म्हणून शांताराम मोरे आहेत तर कपिल पाटील हे खासदार आहेत. सद्यस्थितीला ग्रुप ग्राम पंचायत मध्ये सरपंच नसल्याने गाव सरपंच विना आहे. सर्वात जवळील पर्यटनस्थळ म्हणून अकलोली, गणेशपुरी आणि वज्रेश्वरी येथील गरम पाण्याची कुंडे व नंदकेश्वर व तुंगारेश्वर येथील शिव मंदिरे आहेत. मानसमंदिर हि येथून जवळपास ३२ किमी अंतरावर आहेत. गावाजवळील दुमडा नदी सुद्धा येथील तरुणांचे खास आकर्षण आहे.


References[edit]

Coordinates: 19°27′41.38″N 73°9′7.9″E / 19.4614944°N 73.152194°E / 19.4614944; 73.152194